Home > News Update > राज्य मंत्र्याच्या मुलाचा वाढदिवस; 'न मास्क,न सोशल डिस्टन्स'

राज्य मंत्र्याच्या मुलाचा वाढदिवस; 'न मास्क,न सोशल डिस्टन्स'

राज्य मंत्र्याच्या मुलाचा वाढदिवस; न मास्क,न सोशल डिस्टन्स
X

कोरोना विरोधात मास्क हीच आपली ढाल असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेकदा आपल्या भाषणातून वेळोवेळी सांगत असतात.मुख्यमंत्र्यांच्या अहवानाला नागरिक प्रतिसाद देत असली तरीही मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळात असलेले मंत्री मात्र नियम पाळायला तयार नाहीत.

राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर मुलाचा वाढदिवस साजरा करतानाच फोटो टाकला. सत्तार यांनी टाकलेल्या 5 फोटो पैकी एकही फोटोत सत्तार यांनी मास्क घातलेला नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. एवढच नाही तर त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क घातलं नव्हते.तर सोशल डिस्टनसींग सुद्धा कुठंच दिसून आलं नाही.

"लोका सांगे ब्रह्मज्ञान,..."

राज्यातील सर्वच पक्षातील नेते कोरोनाचे नियमांना केराची टोपली दाखवत आहे. विशेष म्हणजे यात अनेक मंत्र्यांचे समावेश सुद्धा आहे.त्यामुळे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण' अशी परिस्थिती महाविकास आघाडी सरकारची झाली असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई येथील विलेपार्ले येथे गुजराती समाज मेळावा मुंबई कॉंग्रेस कमेटी तर्फे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नाना पटोले उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अनेकांना मास्क लावला नव्हता. या सर्वांचे फोटो पटोले यांच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.

Updated : 22 Feb 2021 8:53 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top