Home > News Update > कोरोनामुळे शालेय वस्तू बनवणारे उद्योग अडचणीत

कोरोनामुळे शालेय वस्तू बनवणारे उद्योग अडचणीत

कोरानाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील आणि देशातील शाळा बंद असल्याने शालेय साहित्य बनवणारे उद्योग अडचणीत आर्थिक सापडले आहेत.

कोरोनामुळे शालेय वस्तू बनवणारे उद्योग अडचणीत
X

कोरानाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील आणि देशातील शाळा बंद असल्याने शालेय साहित्य बनवणारे उद्योग अडचणीत आर्थिक सापडले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील शालेय वस्तू उत्पादित करणारे अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांवर अनेक कामगार देखील अवलंबून आहेत. त्यामुळे कारखान्यांचे मालक आणि कामगारांवर देखील उपासमारीची वेळ आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जांभरून (रोडगे) या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सृष्टी एज्युकेशनल उद्योगाला सध्या घरघर लागली असून, याठिकाणी शालेय वह्या व रजिस्टर तयार करण्यासाठी आणलेला कच्चा माल धूळखात पडून आहेत.

या उद्योगावर आपली उपजिवीका भागविणारे आठ ते दहा मजूर हे सध्या व्यवसाय ठप्प असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेत. तर हा उद्योग उभारणारे उद्योजक सध्या उत्पादित केलेला माल विकला जात नसल्याने चांगलेच अडचणीत सापडलेत. हा व्यवसाय उभारण्यासाठी व्यवसायिकांनी लाखो रुपयांचे भांडवल लावले आहे. कोरोनामुळे या व्यवसायिकांवर स्वत:सह त्यांच्या कामगारांवर उपासमारीचे वेळ आली आहे.

जांभरून (रोडगे) येथील महिला उद्योजक सुनिता ज्ञानेश्वर रोडगे यांनी दीड वर्षापूर्वी जांभरून रोडगे या ग्रामीण भागातील गावांमध्ये सृष्टी एज्युकेशनल उद्योग उभारला होता. मात्र लॉकडाउन व शाळा बंद असल्याने त्यांनी उत्पादित केलेला माल धूळखात पडून आहे. त्यामुळे त्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. सुनिता रोडगे यांनी परिसरातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. मात्र, त्यांच्याही रोजगारावर लॉकडाऊनमुळे गदा आली आहे.

Updated : 1 Aug 2021 5:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top