Home > News Update > Corona Update : धक्कादायक ! सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत 40 टक्क्यांची वाढ

Corona Update : धक्कादायक ! सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत 40 टक्क्यांची वाढ

कोरोना रुग्णसंख्या मंदावली आहे असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. त्यातच सलग दुसऱ्या दिवशी 40 टक्के रुग्णवाढ झाली आहे. पण ही वाढ नेमकी किती आहे? जाणून घेण्यासाठी वाचा...

Corona Update : धक्कादायक ! सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत 40 टक्क्यांची वाढ
X

गेल्या काही दिवसात देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यातच सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्णसंख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाल्याने देशाचे टेन्शन वाढले आहे.

मार्चमध्ये कोरोनाचा वेग मंदावला होता. त्यानंतर महाराष्ट्रात कोरोना नियम हटवण्यात आले होते. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे देशाचे टेन्शन वाढले आहे. तर गेल्या 24 तासात देशात 7 हजार 240 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्याबरोबरच सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4 कोटी 31 लाख 97 हजार 522 इतकी झाली आहे. 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोना रुग्णांचा एक्टिव रेट हा 0.08 टक्के इतका आहे. तर कोरोनामुक्तीचा दर 98.71 टक्के इतका आहे. तर गेल्य 24 तासात 3 हजार 591 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाच्या चौथी लाट येण्याची शक्यता असल्याने मास्क नसेल तर विमान प्रवास करता येणार नसल्याची नवी नियमावली डीसीजीआयने जारी केली आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या किती?

गेल्या 24 तासात राज्यात 2 हजार 701 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १ हजार 327 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही ही महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब आहे.

राज्यात आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आढळून आले आहेत. तर 24 तासात मुंबईत 1765 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Updated : 9 Jun 2022 9:43 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top