Home > News Update > अजित पवारांच्या जिल्हा परिषदेत कोरोनाचं चांगभलं..शेकडोंची गर्दी..! कारवाईचं काय?

अजित पवारांच्या जिल्हा परिषदेत कोरोनाचं चांगभलं..शेकडोंची गर्दी..! कारवाईचं काय?

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. मात्र राज्याला कोरोना नियमांचे धडे देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्हा परिषदेतच कोरोना नियम धाब्यावर बसवत शेकडोंची गर्दी झाली होती. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईचं काय? असा सवाल लोकांकडून व्यक्त केला जात आहे.

अजित पवारांच्या जिल्हा परिषदेत कोरोनाचं चांगभलं..शेकडोंची गर्दी..! कारवाईचं काय?
X

राज्यात कोरोनाची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर वाढत असताना राज्याने कठोर निर्बंध जारी केले. तर कोरोना नियमांच्या बाबतीत राज्याला धडे देणारे अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्हा परिषदेतच कोरोना नियम पायदळी तुडवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पुणे महापालिका व

पुणे महानगरपालिका व बारामती नगरपंचायतीची हद्दवाढ झाली. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या गावातील शिक्षकांना महापालिकेत सामावून न घेता पुणे जिल्ह्यात समायोजित केले. त्यावर अनेक शिक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आक्षेप असणाऱ्या शिक्षक व शिक्षक संघटना, पदाधिकारी यांना मुख्याधिकारी आयुष्य प्रसाद यांनी पत्र काढून चर्चेसाठी बोलाविले होते. या पत्रात किती लोकांनी उपस्थित राहावे.? याबाबत उल्लेख नव्हता. त्यामुळे समायोजन प्रक्रीयेवर आक्षेप असणारे बहसंख्य शिक्षक व शिक्षिका जिल्हा परिषदेत आल्याने कोरोना नियमांचा बोऱ्या उडाला.

मात्र त्यानंतर 'आम्ही तुमच्याच आदेशानुसार आलो आहोत' हे उपस्थित शिक्षकांचे उत्तर ऐकून मुख्याधिकारी आयुष्य प्रसाद यांनी अर्ध्यातच सभागृह सोडून जाणे पसंद केले. मात्र यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने मुख्याधिकारी प्रसाद हे अडचणीत आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना जे आदेश देणारे आहेत, त्यांच्याच कार्यालयात हा प्रकार घडल्याने व उपस्थित शिक्षकांनी ही 'आम्हाला इथे कोरोनाचा स्प्रेड होण्यासाठी आपण बोलावले आहे का.? असा सवाल केला. त्यानंतर ही समायोजन प्रक्रिया आता स्थगित करून, उन्हाळ्यात करावी' अशी मागणी केली आहे. तर चर्चेसाठी बोलवणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 18 Jan 2022 9:03 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top