#corona: मुंबईत लोकल आणि बसेसवर निर्बंध?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 Feb 2021 1:45 PM IST
X
X
राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळेच मुंबईसह राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्याचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्रि विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. सरकारने काही उपाययोजना सुरु केल्या असल्या तरी त्याचा परिणाम काय होईल, हे आज सांगता येत नाही, पण महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असं आपल्याला म्हणता येईल, असं वक्तव्यही त्यांनी केले आहे. मुंबईत सर्वसामान्यांना लोकांना लोकल सुरु केल्यानंतर कोरोनाचे आकडे वाढायला सुरुवात झाल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "मुंबई लोकलमध्ये आणि बसेसमध्ये गर्दी कशी कमी करता येईल याचा विचार सुरु आहे. तसंच मुंबईत लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
G~7vu(D9)(wK-HQ]
Updated : 26 Feb 2021 1:50 PM IST
Tags: corona covid19 lockdown Mumbai local
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire