Home > News Update > कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण, मृतांच्या संख्येत वाढ

कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण, मृतांच्या संख्येत वाढ

ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (omicron varianrt) पार्श्वभुमीवर देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने देशाचे टेन्शन वाढवले होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र गेल्या 24 तासात देशात 627 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण, मृतांच्या संख्येत वाढ
X

गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचा वाढणारा आलेख गेल्या चार दिवसांपासून उतरणीला लागला आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात देशात 2 लाख 51 हजार 209 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर 627 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासह कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली मृत्यूसंख्येत वाढ होत असल्याने देशाची चिंता वाढली आहे.

देशात गेल्या 24 तासात 3 लाख 47 हजार 443 रुग्ण कोरोनामुक्त (Corona recovered case) झाले आहेत. तर 21 लाख 5 हजार 611 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासह देशात सध्या कोरोना रुग्णवाढीचा दर 15.88 टक्क्यांवर पोहचला आहे.

कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी महत्वाची ठरत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी तज्ज्ञांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यापार्श्वभुमीवर देशातील नागरीकांना 164 कोटी 44 लाख 73 हजार 216 लसींचे डोस देण्यात आले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतही मोठी घट आढळून आली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 25 हजार 425 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 36 हजार 708 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र 42 लोकांचा मृत्यू झाला. तर सध्या महाराष्ट्रात 2 लाख 87 हजार 397 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर ओमायक्रॉनचा बी.ए.2 व्हेरियंट आला असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. तर नागरीकांकडून लसीकरणाबाबत हलगर्जीपणा होत असल्याने नवे व्हेरियंट तयार होत आहेत. तसेच या व्हेरियंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत आहे, असे मत वैद्यकीय विशेषज्ञ डॉ. एम वली यांनी व्यक्त केले.

Updated : 28 Jan 2022 10:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top