"गोडसे सिनेमाची घोषणा, मराठी फिल्म इंडस्ट्रीचा सवर्ण चेहरा उघड"
X
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती संपूर्ण जगभरात साजरी होत असताना राज्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्यावरील सिनेमाची घोषणा केली आहे. महेश मांजरेकर यांच्या या घोषणेनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.
The Deadliest Birthday wish ever! Get ready to witness a story no one dared to tell before!
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) October 2, 2021
Sandeep Singh, Raaj Shaandilyaa and Mahesh Manjrekar announce a film "Godse" on Mahatma Gandhi's 152nd birth anniversary
"The story of Nathuram Godse has always been close to my heart. pic.twitter.com/S6s1Er2e30
लेखक दीपक लोखंडे यांनी महेश मांजरेकर यांच्यावर टीका केली आहे. एवढेच नाही तर या निमित्ताने मराठी फिल्म इंडस्त्रीचा सवर्ण चेहरा उघड झाल्याची टीका त्यांनी केली आहे, आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, "गोडसेच्या निमित्ताने सवर्ण मराठी फिल्म इंडस्ट्रीचा बुरखा फाटला हे बरं झालं. मांजरेकर फिल्म काढू शकतो, ते स्वातंत्र्य त्याला आहे तसंच त्याचा निषेध करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. बघू या कोण कोण निषेध करतं ते. छोटा शकीलच्या फोनवर भाई भाई करणाऱ्या मांजरेकरसोबत राहणार का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
गोडसेच्या निमित्ताने सवर्ण मराठी फिल्म इंडस्ट्रीचा बुरखा फाटला हे बरं झालं. मांजरेकर फिल्म काढू शकतो, ते स्वातंत्र्य त्याला आहे तसंच त्याचा निषेध करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. बघू या कोण कोण निषेध करतं ते. छोटा शकीलच्या फोनवर भाई भाई करणाऱ्या मांजरेकरसोबत राहणार का?
— Deepak Lokhande (@WriterDeepak) October 3, 2021
महेश मांजरेकर यांच्या या घोषणेवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील कडक शब्दात टीका केली आहे." महेश मांजरेकर कोण आहे? भारतीय सिनेमांमध्ये त्यांचे योगदान काय आहे? केवळ चर्चेत राहण्यासाठी अशी नाटकं केली जातात", या शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
Who is Mahesh Manjrekar … wat is his contribution to Indian Cinema….to seek attention such dramas are needed pic.twitter.com/nf2S1l2CAE
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 2, 2021