बाबासाहेब पुरंदरेंवरून राज ठाकरे-शरद पवार वाद, लेखक जेम्स लेनने केले भाष्य
जेम्स लेन प्रकरणावरून शरद पवार राज ठाकरे वाद सुरू असतानाच जेम्स लेनने इंडिया टुडेच्या किरण तारे यांना मुलाखत दिली आहे. त्यामध्ये या वादावर खुलासा केला आहे.
X
राज ठाकरे (Raj Thackera) यांच्य गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज्यात मनसे विरुध्द राष्ट्रवादी (MNS Vs NCP) वाद चांगलाच रंगला आहे. त्यातच बाबासाहेब पुरंदरेंवरून मोठा वाद निर्माण होत असताना राज ठाकरे यांनी पुरंदरेंनी शिवाजी महाराज (Shivaji maharaj) घराघरात पोहचवल्याचे वक्तव्य केले. त्यावर राष्ट्रवादीने जेम्स लेन प्रकरणाचा संदर्भ देत बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनला माहिती पुरवल्याचा आरोप केला. त्यावर जेम्स लेन यांची इंडिया टुडेचे प्रत्रकार किरण तारे यांनी मुलाखत घेतली आहे.
राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेत बाबासाहेब पुरंदरेंना (Babasaheb Purandare) राष्ट्रवादीकडून सॉफ्ट टार्गेट केले जात असल्याची टीका केली होती. त्यातच बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास सांगितल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर बाबासाहेब पुरंदरे यांनी कोणत्या पानावर खोटा इतिहास सांगितला ते सांगा, असेही राज ठाकरे म्हणाले होते. तसेच शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने जातीपातीतील भेद गाढून टाकला पाहिजे. पण तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. (Raj Thackearay statement on sharad pawar)
शरद पवार यांनी काय म्हटले होते?
शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देतांना म्हटले की, बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दादोजी कोंडदेव यांना शिवाजी महाराजांचे गुरू म्हटले. मात्र वास्तवात जिजाऊ शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या. याबरोबरच वादग्रस्त लिखाण केलेला जेम्स लेन याला बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती पुरवल्याचे जेम्स लेनच्या पुस्तकात आहे. मात्र या सगळ्या वादावर पुरंदरे यांनी कधीही टिपण्णी केली नव्हती. (Sharad pawar on raj Thackeray and Babasaheb Purandare)
मात्र 2003 साली मनसेने बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह इतिहासकारांनी लिहीलेले पत्र वाचून शरद पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
जेम्स लेनचा खुलासा (James lane)
जेम्स लेनने इंडिया टुडेच्या किरण तारे यांना दिलेल्या ईमेल मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. त्यामध्ये जेम्स लेनने सांगितले आहे की, Shivaji : Hindu king in Islamic india या पुस्तकात बाबासाहेब पुरंदरे यांच्या माहितीचा कोणताही आधार घेतला नसल्याचे म्हटले आहे.
मी ऐतिहासिक लेखन केले नाही तर मी कथा लिहीली आहे. त्यामुळे माझ्या लेखनाकडे कथा म्हणूनच पहायला हवे, असे जेम्स लेनने म्हटले आहे. मी माझ्या लेखनात कथा सांगतो. त्यामुळे माझ्या लेखनात ऐतिहासिक तथ्यांची अपेक्षा का करावी, असेही जेम्स लेनने म्हटले आहे. याबरोबरच मी बाबासाहेब पुरंदरे यांना कधीही भेटलो नसल्याचा खुलासा जेम्स लेनने केला आहे.
2003 मध्ये जेम्स लेन प्रकरणावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. तर संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर ओरियंटल रिसर्च सेंटर फोडले होते. त्यामुळे या पुस्तकाविरोधातील आक्षेपामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने 2004 साली या पुस्तकावर बंदी घातली होती.