राजेश टोपे यांच्याबद्दल लोणीकरांचं वादग्रस्त विधान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी
X
जालना // राज्याचे माजी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री आणि जालन्यातील परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात काल थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडत अतिवृष्टीचं नुकसान आणि पिकविम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. महावितरण कंपनीकडून बळजबरीने होणारी वीजबिल वसुली थांबवावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या दालनात हे आंदोलन करण्यात आलं.
शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरत नाराजी व्यक्त केली.यावेळी लोणीकरांनी पालकमंत्री राजेश टोपे हा राज्यपालांच्या पोटचा आहे का? असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना केला.
दरम्यान आता लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लोणीकर यांचा निषेध केला आहे. याशिवाय जालना शहरातील तालुका जालना पोलिसांत तक्रार देण्यात आली असून लोणीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे.