आसामच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, राहुल गांधींबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य
उत्तराखंड निवडणूकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलत असताना त्यांची जीभ घसरली.
X
: उत्तराखंड निवडणूकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलत असताना त्यांची जीभ घसरली.
पाच राज्यांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच निवडणूकीमुळे वातावरण तापले आहे. तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच उत्तराखंड येथील प्रचारसभेत बोलताना आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
देशात उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा आणि मणिपुर राज्यात निवडणूका पार पडणार आहेत. तर गुरूवारी उत्तरप्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र त्यानंतर आता उत्तराखंड निवडणूकीत आरोप प्रत्यारोपांमुळे रंगत आली आहे. त्यातच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केल्यावरून बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सरमा यांची जीभ घसरली.
हेमंत बिस्वा सरमा आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून कायम चर्चेत असतात. त्यातच उत्तराखंड निवडणूकीच्या प्रचारादरम्यान बोलताना हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, जनरल बिपीन रावत उत्तराखंडचा गौरव होते. त्यांच्या नेतृत्वात पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. मात्र त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्याचे पुरावे मागितले. पण राहुल गांधी हे राजीव गांधींचेच पुत्र आहेत याचे आम्ही पुरावे मागितले का? असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तर लष्कराने केलेल्या कारवाईचा पुरावा मागण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे, असा सवाल हेमंत सरमा यांनी केला.
हेमंत बिस्वा सरमा पुढे म्हणाले की, लष्कराने सांगितले की आम्ही पाकिस्तानमध्ये बाँब फोडला तर फोडला. त्याचे पुरावे का मागत आहात? तुमचा लष्करावर विश्वास नाही का? तुमचा जनरल बिपीन रावत यांच्यावर विश्वास नाही का? तुम्हाला देशाच्या आणि उत्तराखंडमधील लष्करावर विश्वास नाही का? असा सवाल हेमंत सरमा यांनी केला. तर सैनिकांनी केलेल्या कारवाईचे पुरावे मागुन सैनिकांचा अपमान करू नका, असे मत हेमंत बिस्वा सरमा यांनी व्यक्त केले. तसेच तुम्ही राजीव गांधींचेच पुत्र आहात याचे पुरावे आम्ही मागितले आहेत का? अशा वादग्रस्त वक्तव्याचा पुनरुच्चार केला.