Home > News Update > पुण्यात पिण्याचे पाणी दूषित - पाण्यात आढळली लक्षण; वाचा पूर्ण बातमी

पुण्यात पिण्याचे पाणी दूषित - पाण्यात आढळली लक्षण; वाचा पूर्ण बातमी

पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेल्या मुळा-मुठा या दूषित होण्याची मार्गावर आहेत.

पुण्यात पिण्याचे पाणी दूषित - पाण्यात आढळली लक्षण; वाचा पूर्ण बातमी
X

पुण्याच्या मुळा - मुठा नदीला लागून असलेल्या हिंजवडी आणि वाकड या शहरामध्ये Chironomid larvae ( Chironomid अळ्या ) ज्यांना "non-biting midges" असंही म्हटल जातं, ह्या अळ्या आढळून आल्या आहेत. ह्या अळ्या प्रमुख्याने दूषित पाण्यात आढळतात, ह्या अळ्या पुण्याच्या हिंजवडी आणि वाकड परिसरात आढळून आल्याने पुणेकरांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यत आहे.

एकूण परिसराचा विचार करता 800 घरांपैकी अंदाजे 175 घरातल्या पाण्यामध्ये हे जंतु आढळून आल्याने पुणेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

विडियो मध्ये दिसणाऱ्या जंतूंचा रंग गडद लाल आहे. याचाच अर्थ पुणेकरांची तहान भागावणाऱ्य मुळा-मुठा या नद्यांची पाण्याची पातळी ही खालावली असून पाणी प्रदूषित होण्याच्या मार्गावर आहे.अवढं भयाण संकट पुणेकरांसामोर येऊन ठेपलं असतांना. पुणे महानगर पालिका ही पाणी स्वच्छ करायचं सोडून PmcPuneRe रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट (RFD) अंतर्गत निरुपयोगी काँक्रिटीकरणावर वेळ वाया घालवत आहे.यांसारख्या प्रकल्पांमुळे नदीवरील पर्यावरणाचा नाश आणि या समस्या आणखी वाढण्याची शक्यता ओढवली आहे.

नदीकाठचा नाश थांबवण्यासाठी आणि पाणी, सांडपाणी, ड्रेनेज, कचरा, हायसिंथ, डास, मलेरिया, डेंग्यू आणि इतर असंख्य समस्यांना प्राधान्य देण्यासाठी नागरिकांच्या विनंतीकडे पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तांनी वारंवार दुर्लक्ष केले आहे.

महनगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार हे या प्रकरकडे सरल सरल दुर्लक्ष करून रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट (RFD) च्या कामात व्यस्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Updated : 15 Feb 2024 3:14 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top