ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला दिलासा, चार्जशीट दाखल करण्यासाठी दिला अतिरिक्त वेळ
X
शाहरुख खान आपल्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो.मात्र मागील काही काळात शाहरुख खान त्याचा मुलगा आर्यन खानमुळे चर्चेत आला होता. आर्यन खानला एनसीबी ड्रग्स प्रकरणात अटक केली होती.आर्यन खानला आता दिलासा मिळाला आहे.एनसीबीला चार्जशीट दाखल करण्यासाठी ६० दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला आहे.
यापूर्वी सोमवारी, एनसीबीने आर्यन खानशी संबंधित क्रूझ प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा अतिरिक्त वेळ मागणारा अर्ज मुंबईतील सत्र न्यायालयात दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी निर्णय राखून ठेवला होता. या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याचा युक्तिवाद एनसीबीने न्यायालयात केला होता. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात यावी, ती आज न्यायालयाने मान्य केली.
एजन्सीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा नोंदवला होता आणि २० लोकांना अटक केली होती. यातील १८ आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. एनसीबीकडे या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी १८० दिवसांचा कालावधी होता, जो २ एप्रिल २०२२ रोजी संपतो. एनसीबीने क्रूझ कॉर्डेलिया एम्प्रेसवर छापा टाकला तेव्हा नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याच्या तरतुदींनुसार खटला सुरू केला.