Home > News Update > 'मोदीजी 700 शेतकरी तुमच्यामुळेच मेले' ; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

'मोदीजी 700 शेतकरी तुमच्यामुळेच मेले' ; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींबदद्ल जे सांगितले, ते तथ्यच आहे. अशा प्रकारचे असंवेदनशील वक्तव्य हे फक्त अहंकारी, हुकूमशाहीवृत्तीचा शेतकऱ्यांचा मारेकरीच करू शकतो. मोदी, तुम्ही काहीही म्हणालात तरी शेतकरी आंदोलनादरम्यान 700 शेतकरी मेले हे तुमच्यामुळेच, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मोदीजी 700 शेतकरी तुमच्यामुळेच मेले ; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
X

मुंबई // मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींबदद्ल जे सांगितले, ते तथ्यच आहे. अशा प्रकारचे असंवेदनशील वक्तव्य हे फक्त अहंकारी, हुकूमशाहीवृत्तीचा शेतकऱ्यांचा मारेकरीच करू शकतो. मोदी, तुम्ही काहीही म्हणालात तरी शेतकरी आंदोलनादरम्यान 700 शेतकरी मेले हे तुमच्यामुळेच, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, सत्यपाल मलिक यांनी सत्य सांगण्याचे धाडस केले याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. सध्या भाजपामध्ये नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचे धाडस कोणामध्येही नाही. भाजपाचे सर्व नेते मोदींसमोर मान खाली घालून गप्प बसतात. सत्यपाल मलिक यांनी मात्र , धाडस केले आहे असं पटोले म्हणाले. याआधीही मलिक यांनी शेतकरी आंदोलन, कृषी कायद्यांबद्दल परखड मत व्यक्त केले होते. शहीद शेतकऱ्यांबद्दल मोदींचे वक्तव्य हे संतापजनक आहे. एवढा निष्ठूर, निर्दयी व्यक्ती आमच्या देशाचा पंतप्रधान आहे हे दुर्दैव आहे, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवळा असता तर शेतकऱ्यांची रक्तबंबाळ होईपर्यंत डोकी फोडली नसती, खलिस्तानी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला नसता,त्यांच्या मार्गात लोखंडी खिळे ठोकले नसते, अंगावर गाडी घालून चिरडून मारणाऱ्याला अभय दिले नसते असं त्यांनी म्हटले आहे.

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा थोडा आदर्श राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही घ्यावा.असा टोलाही पटोले यांनी लगावला. केंद्र सरकार आणि भाजपाच्या इशाऱ्यावर काम करणे त्यांनी बंद करावे. राज्यपालांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. सत्याची बाजू घ्यावी, संविधानाच्या तत्वानुसार काम करावे. तुमच्या कामाचे मुल्यमापन इतिहास करेल तेव्हा आपण काय आदर्श ठेवणार आहोत याचा विचार करावा, अशी कोपरखिळी पटोले यांनी कोश्यारी यांना मारली.

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, सत्यपाल मलिक यांनी सत्य सांगण्याचे धाडस केले याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. सध्या भाजपामध्ये नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचे धाडस कोणामध्येही नाही. मोदींच्या मंत्रीमंडळातील सहकारी तसेच भाजपाचे सर्व नेते मोदींसमोर मान खाली घालून गप्प बसतात. सत्यपाल मलिक यांनी मात्र धाडस करून सत्यकथन केले आहे. याआधीही मलिक यांनी शेतकरी आंदोलन, कृषी कायद्यांबद्दल परखड मत व्यक्त केले होते. शहीद शेतकऱ्यांबद्दल मोदींचे वक्तव्य हे संतापजनक आहे. एवढा निष्ठूर, निर्दयी व्यक्ती आमच्या देशाचा पंतप्रधान आहे हे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

Updated : 3 Jan 2022 7:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top