भाजपच्या गळाला कोणी लागू नये ; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य
X
नागपूर// महाराष्ट्रात शांतता ठेवा ज्या अफवा पसरवल्या जातात त्याला बळी पडू नये भाजपच्या गळाला कोणी लागू नये असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे. देशामध्ये भुकबळी , शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, देशाचा संविधान धोक्यात आला आहे. या सगळ्या भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. असं पटोले यांनी म्हटले आहे.
सोबतच जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेश , बिहारमध्ये निवडणुका येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्राला बदनाम करण्याचं यांना सुचत. इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात , त्रिपुरा घटनेचे पडसाद महाराष्ट्रात पडत आहे हा भाजपचा जुना प्रयत्न आहे. मात्र आता हिंदू आणि मुस्लिम भाजपच्या या जाळ्यात अडकणार नाही असं पटोले म्हणाले.
दरम्यान आम्ही मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे की, महाराष्ट्रात शांतता ठेवा ज्या अफवा पसरवल्या जातात त्याला बळी पडू नये. भाजपच्या गळाला कोणी लागू नये असं पटोले यांनी म्हटले आहे.
सोबतच त्यांनी म्हटले की, काँग्रेस पक्षाचा आग्रह आहे की , हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावे मात्र याचा अधिकार सरकार आणि विरोधी पक्ष यांच्याकडे असतो त्यांनी ठरवायचा आहे असं पटोले म्हणाले.
भाजपचे महाराष्ट्रातून पहाटेची सरकार गेले त्यामुळे ते रात्री स्वप्न न बघता दिवसा स्वप्न बघतात. त्यामुळे महाराष्ट्रात झालेली आघाडी त्यांना पटू शकत नाही. म्हणून ते सरकार अस्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न करतात. हिंदू-मुस्लीम वादाचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील तर राज्यातील जनता त्याला भीक घालणार नाही. असं त्यांनी म्हटले आहे.