राष्ट्रवादीचे कॉंग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? काय म्हणाले शरद पवार
Max Maharashtra | 9 Oct 2019 1:17 PM IST
X
X
विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला राम राम केल्यानं विरोधी पक्ष पिछाडीवर गेला आहे. यातच माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचाली बाबत बोलताना...
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एकाच व्यासपीठावर दिसतील’ असं वक्तव्य केले होते. यावर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली.
‘सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याशी राष्ट्रवादीचा संबंध नाही. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहोत. आपण सगळीकडे फिरतो, आपल्या पक्षाची स्थिती आपल्याला माहिती आहे.
त्यामुळे त्यांच्या विधानाला अर्थ नाही’ असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कॉंग्रेसमध्ये विलीनिकरण होईल या सुशिल कुमार यांच्या वक्त्यव्याशी आपण सहमत नसल्याचं वक्तव्य केले आहे. ते जळगाव येथे बोलत होते.
Updated : 9 Oct 2019 1:17 PM IST
Tags: election sharad pawar sushilkumar-shinde vidhansabha काँग्रेस राष्ट्रवादी विधानसभा विधानसभा निवडणूक 2019 शरद पवार सुशीलकुमार शिंदे
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire