Home > News Update > महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास काँग्रेसचा विरोध

महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास काँग्रेसचा विरोध

महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसने आता थेट शिवसेनेच्या एका महत्त्वाच्या मागणीला थेट विरोध दर्शवला आहे.

महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास काँग्रेसचा विरोध
X

औरंगाबाद : महाविकास आघाडीमध्ये डावलले जात असल्याची तक्रार करणाऱ्या काँग्रेसने पुन्हा एकदा एका मुद्द्यावरुन थेट विरोधाची भूमिका घेतल्याने शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगादमध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण करून संभाजीनगर करण्याची मागणी आत्तापर्यंत राजकीय पक्षाकडून करण्यात येत होती.मात्र आता या मागणीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने औरंगाबादच संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंत्रालयातील सामन्य प्रशासन विभागाला पाठवला आहे. तसेच सोबतच रेल्वे विभाग, पोस्ट ऑफिस आणि महानगरपालिकीचे नाहरकत सुद्धा पाठवले आहे.

पण नाव बदलण्यापेक्षा विकासावर आमचा भर आहे आणि किमान समान कार्यक्रमामध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा नसल्याने या निर्णय़ास काँग्रेसचा विरोध कायम असेल आणि मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका सांगितली जाईल असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

Updated : 31 Dec 2020 3:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top