Home > News Update > हिवाळी मुंबईत ठिक; पण बजेट अधिवेशन नागपुरात घ्या: ऊर्जामंत्री डॉ. राऊत

हिवाळी मुंबईत ठिक; पण बजेट अधिवेशन नागपुरात घ्या: ऊर्जामंत्री डॉ. राऊत

कोरोना महामारी लक्षात घेऊन विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेतले जात असले तरी विदर्भाच्या प्रश्‍नांना न्याय मिळण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घ्यावे अशी आग्रही माहिती ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केली आहे.

हिवाळी मुंबईत ठिक; पण बजेट अधिवेशन नागपुरात घ्या: ऊर्जामंत्री डॉ. राऊत
X

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपुरात आयोजित न करता मुंबईत आयोजित करण्यात येत असेल तर अर्थसंकल्पी(बजेट) अधिवेशन नागपुरात आयोजित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.

राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीने कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत हे अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात आजवर एक/ दोनदाच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे झालेले नाही.

"नागपूर येथे अधिवेशनानिमित्ताने 8 हजार पोलिसांसह एकूण 18 हजार कर्मचारी आले असते. आयसीएमआरने दिलेल्या इशाऱ्यानुसार नागपुरात डिसेंबर महिन्यात थंडीच्या लाटेमुळे नागपूर आणि परिसरात कोरोना वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागपूर ऐवजी मुंबईत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मात्र विदर्भातील प्रश्नांना सोडविण्यासाठी आणि विदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नागपूर येथे अधिवेशन होणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पी अधिवेशन नागपुरात आयोजित करण्यात यावे," अशी मागणी ऊर्जामंत्री राऊत यांनी केली.

Updated : 10 Nov 2020 9:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top