Home > Election 2020 > राजीनाम्या नंतर काँग्रेसला 'अच्छे दिन'?

राजीनाम्या नंतर काँग्रेसला 'अच्छे दिन'?

राजीनाम्या नंतर काँग्रेसला अच्छे दिन?
X

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या काँग्रेसच्या चार राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचाही समावेश आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीत शून्यावर आलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. गोव्याचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी ही राजीनामे दिले आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केल्यानं पराभवाचं नैतिक दडपण इतर प्रदेशाध्यक्षांवर आलं आणि याच मानसिकतेतून हे राजीनामा सत्र काँग्रेसमध्ये सुरू झालं आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

मध्यप्रदेशकडे सगळ्यांचं लक्ष

कमलनाथ यांच्या कडे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशी दुहेरी जबाबदारी होती, त्यामुळे त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं. मध्य प्रदेशातील लोकसभेच्या 29 जागांपैकी फक्त एक जागा सत्ताधारी काँग्रेसला जिंकता आली आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ हा छिंदवाडा मतदारसंघातून निवडून आला आहे. मध्य प्रदेश मध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत आहे. त्यामुळे कमलनाथ आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

काँग्रेसच्या नेते, पदाधिकारी यांच्या राजीनामा सत्रामुळे काँग्रेसला आतातरी 'अच्छे दिन' येतील का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Updated : 26 May 2019 7:05 PM IST
Next Story
Share it
Top