Home > News Update > राज्यातील भाजप आणि संघनिष्ठ अधिकारी शोधा, काँग्रेस करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील भाजप आणि संघनिष्ठ अधिकारी शोधा, काँग्रेस करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील भाजप आणि संघनिष्ठ अधिकारी शोधा, काँग्रेस करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी
X

Courtesy -Social media

राज्यात गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेत्यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी मंगळवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना काँग्रेस नेत्यांचे एक शिष्टमंडळ भेटेल असा निर्णय घेण्यात आला. प्रशासनात भाजप आणि संघनिष्ठ IAS आणि IPS अधिकारी कार्यरत आहेत. तेच सरकारमधील माहिती विरोधकांना पोहोचवत आहेत, यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकं, सचिन वाझेचा संबंध, मनुसुख हिरेन यांची हत्या, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला १०० कोटी रुपये खंडणीचा आरोप, बदल्यांच्या रॅकेटचा आरोप यामुळे सरकारची प्रतीमा मलिन झाली आहे. गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस खात्यात बदल्यांचे रॅकेट असल्याचे उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासर्व पार्श्वभमीवर काँग्रेसची भूमिका काय याबद्दल चर्चा उपस्थित केली जात होती. त्यानंतर मंगळवारी राज्यातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गृहमंत्री, पोलीस खाते तसेच राज्य सरकारमधील गुप्त माहिती विरोधकांकडे जातेच कशी अशी चर्चा करण्यात आली. या सार्व पार्श्वभूमीवर भाजप सरकारच्या काळात भाजप आणि संघधार्जिण्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे अधिकारी भाजपला मदत करत असल्याने सरकारची बदनामी होत आहे, अशीही चर्चा झाली.

Updated : 24 March 2021 10:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top