Home > News Update > काय तो बॅनर, काय ते पुणेरी टोमणे....

काय तो बॅनर, काय ते पुणेरी टोमणे....

काय तो बॅनर, काय ते पुणेरी टोमणे....
X

पुणे : बंडखोरआमदार शहाजी बापू पाटील यांचा गोहाटी येथील काय ती झाडी काय तो डोंगार या डायलॉगने अख्खा महाराष्ट्रात गाजवला. पण आता पुणेकरांनी शहाजीबापूंचा तो डायलॉग आपल्या पुणेरी पाटीवर घेत महापालिकेला जोरदार चिमटे काढले आहेत.

पुणे शहरात सध्या लागलेल्या बॅनरमुळे शहाजी बापूंच्या त्या डायलॉगची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शहाजी बापूंच्या त्या डायलॉगचा वापर करत काँग्रेसने महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. काय ते रस्त्यावरचे खडडे, काय ती घरपट्टी वाढ, काय ती पाणीपट्टी वाढ, काय ती स्मार्ट सिटी, काय तो घोटाळा अशाप्रकारचे बॅनर सध्या पुण्याच्या काही भागात झळकलेले दिसत आहे.

पुणे महापालिकामध्ये 5 वर्ष भाजपची सत्ता होती.या पार्श्वभूमीवर वाढवलेल्या करांमुळे काँग्रेसचे नेते संजय बालगुडे यांनी भाजपला टोला लगावत ही बॅनरबाजी केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून त्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस तिन्ही पक्ष सत्ताधारी भाजपवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत. पुणे महापालिकेत भाजपने पाणीपट्टी ,घरपट्टी यामध्ये वाढवलेले दर आणि रस्त्यावरची अपुरी कामं आणि खड्डे या विषयांवरून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

Updated : 8 July 2022 6:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top