Home > News Update > नागपूरमध्ये भोयर विरुद्ध बावनकुळे अशी थेट लढत होणार

नागपूरमध्ये भोयर विरुद्ध बावनकुळे अशी थेट लढत होणार

नागपूरमध्ये भोयर विरुद्ध बावनकुळे अशी थेट लढत होणार
X

नागपूर// स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी नागपूरमधून काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. सोमवारी भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 34 वर्ष ते भाजप मध्ये होते. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी रिंगणात उतरणार आहे. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यामुळे नागपूरमध्ये भोयर विरुद्ध बावनकुळे अशी थेट लढत होणार आहे.

सोमवारी नागपूर शहर काँग्रेसच्या देवडिया काँग्रेस भवन या कार्यालयात रवींद्र भोयर यांनी आपला 34 वर्षांचा भाजप सोबतचा प्रवास थांबवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्यासह नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि नागपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक उपस्थित होते. रवींद्र भोयर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून चार वेळेला ते नगरसेवक म्हणून निवडून आलेत. ते आणि त्यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेक दशकांपासून जोडलेले आहे. काँग्रेसनं भोयर यांना अपेक्षाप्रमाणे विधान परिषद निवडणुकीचं तिकिट दिलं आहे.

Updated : 23 Nov 2021 7:32 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top