चंद्रकांत पाटलांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा 'गेम'
Max Maharashtra | 4 Oct 2019 4:21 PM IST
X
X
पुण्यातील कोथरूडमध्ये मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी आघाडीनं व्यूहरचना केल्याचं दिसून येतंय.
- चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदेंचे आव्हान
- 'युती होणार म्हणजे होणार मात्र, जुन्या फॉर्म्युल्यावर नाही' - चंद्रकांत पाटील
- 'वंचित किंवा ईव्हीएम मुळे विजयी झालो नाही' – चंद्रकांत पाटील
त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांची वाट खडतर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष महा-आघाडीकडून पाठिंबा देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली.
पुण्यातील कोथरूडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलत चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली म्हणुन त्या नाराज असल्याचं म्हटलं जात होतं.
तसंच कोथरूडमधून स्थानिक उमेदवार द्यावा यासाठी चंद्रकांत पाटील यांना विरोध करण्यात आला होता. परंतु त्यानंतरही चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
आता आघाडीने चंद्रकांत पाटील यांना घेरण्याची व्यूहरचना आखली असून त्यांनी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Updated : 4 Oct 2019 4:21 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire