औरंगाबादच्या नामांतरावर समन्वय समितीमध्ये चर्चा करणार- अशोक चव्हाण
Admin | 8 Jan 2021 4:15 PM IST
X
X
औरंगाबादच्या नामांतराचा विषय सध्या चर्चेत आहे. काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला आहे. या वादावर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये चर्चा करण्याची गरज आहे, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसचा विरोध कायम आहे, शिवसेनेची आधीपासूनची नामांतराची भूमिका आहे, पण सध्या आम्ही एकत्र असल्याने समन्वय समितीने यावर तोडगा काढावा अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली आहे.
Updated : 8 Jan 2021 4:15 PM IST
Tags: congress Ashok Chavan
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire