दहावी , बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घाव्यात तरी कशा ? शिक्षकांमध्ये संभ्रम
X
मुंबई : दहावी-बारावी बोर्ड परीक्षा दोन महिन्यावर आल्या असताना बोर्डाच्या तोंडी आणि प्रॅक्टिकल परीक्षा नेमक्या कशा घ्याव्यात असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. मागील 6 ते 8 महिन्यापासून एकही प्रॅक्टिकल शाळांमध्ये झालेले नाही. त्यातच अजूनही अनेक शाळेत 30 ते 40 टक्केच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे परीक्षा घ्याव्यात तरी कशा असा सवाल शिक्षक उपस्थित करत आहे , त्यामुळे शिक्षण विभागाने प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षाबाबत विचार करून सूचना द्याव्यात असं शिक्षकांचं म्हणणं आहे.
दरवर्षीप्रमाणे मार्च-एप्रिल महिन्यात परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा सुरू होण्यापूर्वी बोर्डाच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहेत. त्यामुळे उरलेल्या दीड ते दोन महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण कशा करून घ्यावा?असा प्रश्न शिक्षकांसमोर आहेत.
शिक्षकांसमोर अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षा घेणे, तसेच प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेणे असं भलं मोठं आव्हान असणार आहे. त्यातच अनेक ठिकाणी शाळा अजूनही तीन ते चार तासच सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे.