Home > News Update > बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येऊ:भगतसिंह कोश्यारी

बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येऊ:भगतसिंह कोश्यारी

बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येऊ:भगतसिंह कोश्यारी
X

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मोजक्याच मात्रांचा नुकताच प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने दि. १ मे २०२१ रोजी महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रांवर केवळ १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात येत आहे. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्यातरी लशीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे.

भविष्यात लशींच्या मात्रांचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करीत असून नागरिकांनी लसीकरण करवून घेण्यासाठी गर्दी करू नये व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे या निमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ५ रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे त्या पाच रुग्णालयांची नावे पुढील प्रमाणे:

१. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).

२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)

३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).

४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).

५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.

Updated : 1 May 2021 8:53 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top