Home > News Update > धनगर जागर यात्रेतून आ. गोपीचंद पडळकरांचा कोकण दौरा

धनगर जागर यात्रेतून आ. गोपीचंद पडळकरांचा कोकण दौरा

धनगर जागर यात्रेतून आ. गोपीचंद पडळकरांचा कोकण दौरा
X

आमदार गोपीचंद पडळकर धनगर जागर यात्रा सुरू केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन धनगर समाजाला एकत्र आणण्याचं काम या धनगर जागर यात्रेतून करण्यात येणार आहे. आमदार पडळकर हे मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबरला दुपारी 01.00 वाजता गोळीबार मैदान खेड येथे दाखल होणार आहे. श्री गणेश मंगल कार्यालय भरणे येथे या जागर यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यातं आलं आहे.

धनगर ST आरक्षण मिळावं, धनगर बांधवांना उद्योगधंदे, रोजगार मिळावा यासाठी गोपीचंद पडळकर नेहमीच प्रयत्नशील असतातं. एकंदरीत ST आरक्षणाचा लढा आणि पुढील रणनिती या यात्रेच्या निमित्ताने आयोजन संपूर्ण राज्यात करण्यात आले होतं. त्या कोकणात देखील मोठ्या संख्येने धनगर बांधव असल्याने या धनगर समाज बांधवाना ST आरक्षणासंदर्भात संबोधित करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचे खेड येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्हातील धनगर समाज एकवटत हजारोंच्या संख्येने या जागर यात्रे सहभागी होणार असल्याची माहीत समोर आली आहे.

Updated : 14 Oct 2023 8:09 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top