Home > News Update > आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन
X

मुंबई : भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहनमुंबई शहर जिल्ह्यात ३०-मुंबई दक्षिण मध्य, ३१-मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात २४ लाख ४६ हजार ८८ मतदार असून जिल्ह्यात दिनांक २० मे २०२४ (सोमवार) रोजी मतदान होणार आहे. तर दिनांक ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी मतमोजणी होणार आहे. तरी, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क येत्या २० मे २०२४ रोजी आवर्जून बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

* निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दीची तारीख २६ एप्रिल २०२४

* नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम तारीख ३ मे २०२४

* नामनिर्देशन पत्राची छाननी तारीख ०४ मे २०२४

* उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख ०६ मे २०२४

* मतदानाचा दिनांक २० मे २०२४

* मतमोजणी दिनांक ०४ जून २०२४

* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक ६ जून २०२४


सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता यापूर्वीच लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे सर्व संबंधित घटकांनी काटेकोरपणे पालन करावे, मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांसाठी असलेल्या सोयीसुविधा, मतदान केंद्राची रचना तेथील सुविधा, संवेदनशील मतदान केंद्रासंदर्भात विशेष उपायोजना याबाबत सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी साडेबारा हजार कर्मचारी सज्ज :

लोकसभा निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या ३०-मुंबई दक्षिण`मध्ये ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी साडेबारा हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. निवडणुका पारदर्शक नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी संजय यादव यांनी दिली.

मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांची माहिती :

एकूण मतदार :- २४ लाख ४६ हजार ८८

एकूण पुरुषः- १३ लाख २१ हजार ७८२

एकूण स्त्री:- ११ लाख २४ हजार ८४

एकूण तृतीयपंथीः- २२२

१८ ते १९ या वयोगटातील मतदार

एकूण मतदारः- १७ हजार ७२६

एकूण पुरुषः ९ हजार ८७६

एकूण स्त्री:- ७ हजार ८५०

दिव्यांग मतदार

एकूण मतदार :- ५०९३

एकूण पुरुष:- ३०३२

एकूण स्त्रीः- २०६१

मतदान केंद्रांची माहिती

एकूण मतदान केंद्रः- २ हजार ५०९

एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ०८

एकूण सखी महिला मतदान केंद्रः- ११

नवयुवकांसाठी मतदान केंद्रः- ११

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र :- ०८

निवडणूक कामासाठी मुंबई जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सज्ज :

३०-मुंबई मध्य दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी कोकण विभागाचे अपर आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांच्या सह उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील,जयकृष्ण फड, वैशाली चव्हाण, प्रशांत पानवेकर तर तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिपाली गवळी, प्रियंका ढोले, अमोल कदम आणि नायब तहसीलदार संजय मिरगांवकर, अनिल अहिरे ,एस.एस.पांडे, सी.बी चांदोरकर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे.

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांच्यासह उपजिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित देशमुख, गणेश सांगळे, कृष्णा जाधव, बाळासाहेब वाकचौरे, अभिजित भांडे-पाटील आणि विजय कुमार सुर्यवंशी तसचं तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा कामथे, प्रतिभा वराळे, पल्लवी तभाने आणि आदेश डफळ, सचिन खाडे, सारिखा कदम यांची तर नायब तहसीलदार डी.टी. केळुसकर, दिपाली कुलकर्णी, बी एस गायकवाड, रामकिसन चव्हाण, अनिल कुळे आणि सुनील कदम यांचा समावेश आहे.

निवडणूक आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी फ्लाईंग सर्व्हेलन्स टीम (FST), ९४ स्टॅटस्टीक सर्व्हेलन्स टीम (SST)-९९, व्हिडीओ व्हिवींग टीम (VVT)- १४, व्हिडीओ सर्व्हेलन्स टीम (VST)-२४ टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीसाठी मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाही मध्ये सहभागी व्हावे. मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in / Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक 1950 यावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

Updated : 23 March 2024 2:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top