Home > News Update > कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमा साजरी

कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमा साजरी

कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमा साजरी
X

नवी मुंबई - समुद्र किनारी राहणारे कोळी बांधव हे नारळी पोर्णिमा उत्साहात साजरी करतात. कोळी बांधव दर्या राजाला शांत करण्यासाठी हा सण साजरा करतात. हा सण कोळी समाजात महत्वाचा मानला जातो. मासेमारीची सुरवात करण्याअगोदर समुद्रात नारळ सोडून पुजा केली जाते. एकंदरीतच पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो, यावेळी मासेमारी करण धोक्याची ठरू शकते. त्यामुळे या काळात बोटी, जहाजांची वर्दळ बंद केली झाते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. आज नवी मुंबईतील कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह असंख्य कोळी बांधव उपस्थित होते.

Updated : 30 Aug 2023 4:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top