Home > News Update > विधानसभा नंतरच सहकारी संस्था निवडणुका: डिसेंबरपर्यंत स्थगित...

विधानसभा नंतरच सहकारी संस्था निवडणुका: डिसेंबरपर्यंत स्थगित...

विधानसभा नंतरच सहकारी संस्था निवडणुका: डिसेंबरपर्यंत स्थगित...
X

विधानसभा पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या राज्य सरकारने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान या निर्णयातून २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था, न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या संस्था आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बाकी आहे, अशा संस्थांना यातून वगळण्यात आले आहे.

याआधी जून २०२४ मध्ये पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता विधानसभा संपल्यानंतरच म्हणजे पुढील वर्षी या निवडणुका होतील.

Updated : 8 Oct 2024 2:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top