भाजप आता घंटानाद का करत नाही?
X
कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर प्रवासी मजुरांवरुन सुरु झालेला राज्य सरकाराने रेल्वेच्या वादाने नाही उचल खाल्ली असून आता नवरात्रानिमित्त राज्य सरकारने महिलांना दिलेल्या प्रवासाच्या परवानगी वरून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त राज्यसरकारने महिलांना रेल्वेमधून प्रवासासाठी रेल्वे कडे परवानगी मागितली होती. परंतु रेल्वेने यासाठी रेल्वे बोर्डाची परवानगी लागेल असा पवित्रा घेतला आहे. त्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसने रेल्वे आणि रेल्वे मंत्र्यांवर टीका केली आहे.
राज्य सरकारने रेल्वेला महिलांना प्रवासाची मुभा द्या असे कळवले आहे. CPM रेल्वे बोर्डाची परवानगी लागेल अशी कारणं देत आहेत.
मंदिरे उघडा म्हणून बोंब ठोकणाऱ्या भाजपाला मायभगिनींकरिता लोकल चालू व्हावी व नवरात्रीत त्यांची सोय होईल याची तमा नाही. भाजपाचा आवाज बंद का? घंटानाद का नाही? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसच्या या आरोपावर आता म्हणजे काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.