मंदीरं उघडण्यावरुन ठाकरेंचा विरोधकांना टोला
X
मुंबई : राज्याच्या अनलॉक प्रक्रीयेत टप्प्याटप्यानं सेवा सरु होत असताना विरोधकांकडून मद्यालयं सुरु केली मग मंदीरं का सुरु करत नाही अशा पध्दतीनं सरकारवर दबाव आणला जात आहे. "मंदिराच्या विषयावर मी हळूवार जातोय. काही जण म्हणतात, तुम्ही हे उघडलं, ते उघडलं नाही. जबाबदारी तुमच्यावर नाही आमच्यावर आहे, त्यापेक्षाही जनतेवर आमचं प्रेम आहे. उगाच तंगडयात तंगड घालून, गोष्टी बंद ठेवण्याची आमची मानसिकता नाही" अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांना खडसावलं आहे."आता नवरात्री येत आहे, त्यानंतर दिवाळी आहे. खूप काळजीपूर्वक एक-एक पाऊल टाकावे लागणार आहे.
उघडलेल्या दरवाजातून सुबत्ता, समृद्धी आली पाहिजे, करोना नको, तरच त्या उघडलेल्या दरवाजाला अर्थ आहे"असे उद्धव ठाकरे म्हणाले.त्याचवेळी फडणवीस सरकारच्या काळातील कोट्यावधी वृक्ष लागवडीचीही फिरकी मुख्यमंत्र्यांनी घेतली. कोट्यावधी वृक्ष लावलेले कुठेच दिसत नाहीत. पण जे जंगल आहे ते आधी वाचवल आहे असाही चिमटा मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढला. आरे कारशेड कांजुरला हलवून जंगल जपल्याच समाधान असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना मुंबई लोकल कधी सुरू होणार याविषयी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. 'राज्यांतर्गंत रेल्वेची वाहतूक सुरू केली आहे. हळूहळू काही गोष्टी सुरु केल्या आहेत. लोकलसाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. कारण मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलनं जायचंय. लोकलची संख्या वाढल्यानंतर आपण त्यातून अधिक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ. राज्यांतर्गंत हरिद्वारपर्यंत वाहतूक सुरू झाली आहे,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जे सुरू केलं ते पुन्हा बंद करावं लागू नये म्हणून खबरदारी घ्यावी लागेल. पुन्हा लॉकडाऊन करावा लागणार नाही. याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ज्या प्रमाणे आतापर्यंत सहकार्य केलं तसं यापुढेही करायचं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
जिम सुरू करण्याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे. जिमसाठी नियमावली आवश्यक आहे. त्याविषयी बोलण सुरु आहे. व्यायाम करता श्वासाची प्रक्रीया वेगात होते. अशात एकादा कोरोना रुग्ण आला तर जिममधे वेगानं सर्वाना करोना संसर्ग होईल, असं सांगतानाच जीम इतक्यात सुरू होणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.