Home > News Update > सूडचक्र चालवाल तर सुदर्शन चक्र वापरु, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला इशारा

सूडचक्र चालवाल तर सुदर्शन चक्र वापरु, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला इशारा

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपवर जोरदार हल्ला केलेला आहे.

सूडचक्र चालवाल तर सुदर्शन चक्र वापरु, मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला इशारा
X

"केंद्र सरकार सूडाच्या भावनेने राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांविरोधात कारवाई करत असेल तर नाईलाजाने आम्हालाही तसेच उत्तर द्यावे लागेल" असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे . महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल संजय राऊत यांना सामनासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिलेला आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच या निमित्ताने प्रतिक्रिया दिलेली आहे.

कुणाच्या मुलाबाळांना लक्ष करणार असाल तर तुम्हालाही मुलबाळ आहेत ते लक्षात ठेवा या शब्दात मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे सक्षमपणे काम करून पूर्ण करेल, असा दावाही त्यांनी केला. तुम्हाला जर कारवाईच करायची असेल तर आम्ही काही नाव देतो, आमच्याकडे ही मालमसाला तयार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. पण तुम्हाला सूड काढायचा असेल तर तुम्ही जर एक सूड काढला तर आम्ही दहा सूड काढू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.



Updated : 27 Nov 2020 12:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top