ममता जिंकल्या! आता कोरोनाकडे लक्ष देऊया: उद्धव ठाकरे
X
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा अधिक जागा मिळवत तिसऱ्यांदा राज्यात सत्ता मिळवली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराजय करण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले होते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या निवडणुकीत ममता यांच्या पक्षाचा पराभव करण्यासाठी जंग जंग पछाडले होते. तरीही ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा पराभव झाला नाही. भाजपच्या या पराभवानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत भाजपचा समाचार घेतला आहे.
काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी?
ममता बॅनर्जी या 'बंगाली' जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी प. बंगालच्या भूमीवर एकवटली.
त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळविला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया.
असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकीकडे ममता यांचं अभिनंदन केलं आहे.तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव केला आहे.