Home > Election 2020 > 'आमचं ठरलंच नव्हतं...'

'आमचं ठरलंच नव्हतं...'

आमचं ठरलंच नव्हतं...
X

भाजप (BJP) आणि शिवसेना(ShivSena) महायुतीचा सत्ता स्थापनेतील वाटाघाटीचा तिढा कायम आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असा फॉर्मुला पक्का होणार का आणि भाजप सेनेला सत्तेत समान वाटा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेकडे ५०-५० फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रीपद यावं म्हणून पक्षातील प्रमुख नेते आग्रही भूमिका घेत आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्री म्हणून सेनेकडून प्रोजेक्ट केलं जातंय. त्यादृष्टीने कॅम्पेनही सुरु करण्यात येतंय. शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या दै. सामनातूनही संजय राऊत (Sanjay Raut)आक्रमक भूमिका मांडत आहेत.

मात्र, भाजपकडून यावर कोणतीच सकारात्मक प्रतिक्रिया येत नाहीय. निवडणूक प्रचारात ‘मी पुन्हा येईन’ असा विश्वास दाखवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांनीही संयम बाळगत अपक्ष आमदारांसोबत वाटाघाटी करण्यावर जोर दिला आहे.

याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "समसमान जागांसाठी चर्चा झाली होती. मात्र शिवसेनेला कोणते पद द्यायचे हे चर्चेला बसल्यानंतर मेरीटवरच ठरवू. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता परंतु यावर कोणताही शब्द दिलेला नाही किंवा निर्णय झालेला नाही"असं म्हणत शिवसेनेला खवळलं आहे.

सामनामधून होणाऱ्या टीकेविषयी बोलताना फडणवीस यांनी अशा टिकांना अधिक महत्व देत नसल्याचं म्हटलंय. मी सामना वाचत नाही. जे छापून आलंय ते लोक मला सांगतात. सेनेच्या या भूमिकेमुळे १०० नाराज असून एकत्र निवडणूक लढवायची, निवडूनही यायचं आणि नंतर विरोधी भूमिका घ्यायची हे लोकांनाही आवडत नाही असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी असून समान सत्तावाटपाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी फिरवताच शिवसेनेने भाजपसोबत होणारी सरकारस्थापनेची बैठकच रद्द केली.

भाजपची आज विधानभवन येथे बैठक होणार असून या बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही विधिमंडळ पक्ष नेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे.

Updated : 30 Oct 2019 11:27 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top