‘राष्ट्रवादी म्हणजे नॅनो पार्टी’- देवेंद्र फडणवीस
Max Maharashtra | 17 Oct 2019 7:08 PM IST
X
X
पालघर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विक्रमगड विधानसभा मतदार संघात डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारा दरम्यान उपस्थित होते. “राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात गेल्या सत्तर वर्षात कामे झाली नाही. ती कामे केवळ पाच वर्षात केल्याचं सांगत राष्ट्रवादीचे पवार साहेब यांची अवस्था शोले पिक्चर सारखी झाली आहे. काही इधर काही उधर जावं असे सांगत राष्ट्रवादी म्हणजे नॅनो पार्टी झाली आहे.” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
“तसंच राष्ट्रवादी सरकारने पंधरा वर्षाचा हिशोब द्यावा, नंतर आम्ही पाच वर्षाचा हिशोब देतो.” असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारा दरम्यान जव्हार येथील सभेत केलं आहे.
विरोधी पक्ष हताश.. शेंबडा पोरगंही महायुतीचं सरकार येण्याचं सांगतोय...
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही विरोधी पक्ष हताश झाले आहेत. काँग्रेसच्या मागील वेळी आलेल्या ४२ पैकी २४ जागाही यावेळी येणार नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
“राहुल गांधी बॅंकॉक मध्ये जाऊन बसले होते. त्यांच्या नेत्यांनी आग्रह करून त्यांना जेमतेम महाराष्ट्रात आणले, त्यांना माहीत आहे येथे आपला काहीही उपयोग होणार नाही, म्हणून ते बाहेर देशात जाऊन बसले होते. कोणाचे सरकार येणार असे विचारले तर शेंबडा पोरगंही महायुतीचे सरकार येणार असल्याचे सांगतोय” असा टोला महाआघाडीला फडणीस यांनी लगावला आहे.
शरद पवारांची अवस्था शोलेतील जेलरसारखी...
फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरही आपल्या भाषणात निशाणा साधला. “शरद पवारांची अवस्था शोलेतील जेलरसारखी झाली आहे. आधे ईधर जावं, आधे उधर जावं और बाकी मेरे पिछे आवं" अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचं फडणीस यांनी म्हटलं आहे.
माजी मंत्री मनिषा निमकर यांचा भाजपात प्रवेश..
माजी पर्यटन विकास राज्यमंत्री आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्या मनिषा निमकर यांनी यावेळी भाजपातील प्रवेश केला तर विक्रमगडचे काँग्रेस चे पदाधिकारी शिवराम गिरंदले यांनी ही भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
https://youtu.be/gmGr8-42wb4
Updated : 17 Oct 2019 7:08 PM IST
Tags: bjp BJP-Shivsena Alliance CM devendra Fadanavis Maharashtra Election 2019 Palghar BJP Prachar sabha Shivsena
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire