Home > News Update > मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी बिल थकले, डिफॉल्टर यादीत समावेश

मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी बिल थकले, डिफॉल्टर यादीत समावेश

मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी बिल थकले, डिफॉल्टर यादीत समावेश
X

विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सुरू होताच पहिल्या दिवशी सरकारच्या अडचणीत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या बंगल्याला मुंबई महानगरपालिकेने डिफॉलटर घोषित केले आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या बंगल्यांची 24 लाख 56 हजार 469 रुपयांची थकबाकी असल्याचे उघड झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरील पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती गोळा केली आहे. या अंतर्गत मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या सरकारी बंगल्यांची पाण्याची एकूण 24 लाख 56 हजार 469 थकबाकी आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही बंगल्याचा समावेश आहे

कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्यांचे पाणी बिल थकीत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (वर्षा बंगला)

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी (तोरणा)

अर्थमंत्री अजित पवार (देवगिरी)

जयंत पाटील (सेवासदन)

नितीन राउत, ऊर्जामंत्री (पर्णकुटी)

बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री (रॉयलस्टोन)

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर)

अशोक चव्हाण (मेघदूत)

सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन)

दिलीप वळसे पाटील (शिवगिरी)

सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन)

राजेश टोपे (जेतवन)

नाना पाटोळे, विधानसभा अध्यक्ष (चित्रकुट)

राजेंद्र शिंगे (सातपुडा)

नवाब मलिक (मुक्तागीरी)

छगनराव भुजबळ (रामटेक)

रामराजे निंबाळकर विधान परिषद सभापती (अजंता)

सह्याद्री अतिथीगृह

सरकारी विभागच पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सामान्य जनते का भरावे? असा सवाल शकील अहमद शेख यांनी केला आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल मंत्र्यांच्या शासकीय आवासाचे पाणी खंडित करण्याची हिम्मत करणार का? असा प्रश्न शकील अहमद शेख यांनी विचारला आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा तोरणा बंगला यांचे पाणी बिल थकीत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पण यासंदर्भात आम्ही शकील शेख यांना संपर्क केला तेव्हा बातम्या आल्यानंतर ते बिल ऑनलाईन भरले गेले असा दावा केला आहे.

Updated : 15 Dec 2020 3:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top