Home > News Update > आठ वर्षीय कोरोनाबाधित मुलाकडून स्वछतागृहांची स्वच्छता…

आठ वर्षीय कोरोनाबाधित मुलाकडून स्वछतागृहांची स्वच्छता…

आठ वर्षीय कोरोनाबाधित मुलाकडून स्वछतागृहांची स्वच्छता…
X

कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना दुसरी, तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याचेही भाकित तज्ज्ञांनी वर्तविले असताना बुलडाण्यात एक धक्कादायक प्रकार व्हायरल व्हिडिओमुळे समोर आला आहे.

जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांचा संग्रामपूर तालुक्यात दौरा होता. जिल्हाधिकारी आपल्या शाळेतील कोरोनाबाधितांच्या विलगीकरण सेंटरला भेट देवू शकतात, म्हणून संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात 15 कोरोनाबाधित रुग्ण असताना तेथील स्वछतागृहाची एका 8 वर्षाच्या शाळकरी मुलाकडून हाताने साफसफाई करून घेण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या मुलाला साफसफाई करण्यासाठी धमकविण्यात आल्याचेही समोर आले आहे. मुलाचा साफसफाईचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या परिसरात प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे..

Updated : 2 Jun 2021 7:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top