साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजेंचे समर्थक भिडले, शस्त्रांचा वापर
X
साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले समर्थकांमध्ये जोरदार सशस्त्र राडा झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथदारांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राड्यात ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, या सर्व घटनेनंतर परिसरासह खासगी हॉस्पिटल बाहेर तणावाचे वातावरण आहे.
बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, शैलेश बडेकर, निखिल किर्तीकर यांच्यासह इतर अनोळखी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सनी मुरलीधर भोसले (सर्व रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
संशयितांनी गुप्ती, रॉड, कोयता याचा हल्ल्यासाठी वापर केला असून पिस्टल चा धाक दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व राडा राजपथावरील पोलिस करमणूक केंद्राच्या गेट परिसरात झाला आहे.
राड्याचं कारण काय?
उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली आणि त्यातून भडका उडाला अशी माहिती समोर येत आहे. या राड्यात दोन्ही गटांच्या तुफान हाणामारीतून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
इम्तियाज मुजावर