2019 च्या निवडणुकीत EVM हॅक केल्याचा दावा ; व्हायरल व्हीडीओ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
X
कल्याण : सोशल मीडियावर विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅकिंग करत कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना विजयी केल्याचा एका हॅकरचा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये उल्हासनगर परिसरात राहणारा आशिष चौधरी नावाचा व्यक्ती आहे. आशिष चौधरी हा तोच व्यक्ती आहे ज्याने कल्याण पूर्वेचे आमदार गायकवाड यांच्या मुलाला सॉफ्टवेअर बनवून देतो म्हणून लाखोचा गंडा घातला होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र जेलमध्ये असताना ही त्याने ईव्हीएम मशीन हॅकिंग करत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांचा विजय निश्चित असतांना आशिष चौधरीने EVM मशीन हॅक करून भाजप आमदार गणपत गायकवाड यांना विजय केल्याचा दावा केला आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मात्र याबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी आपला त्या व्यक्तीशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत व्हायरल व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त करत नक्की हा हॅकर कश्या प्रकारे हॅकिंग करतो याची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे यासाठी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस व निवडणूक आयोग यांना चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पत्र दिले आहे
तर याबाबत शिवसेनेचे पराभूत उमेदवार धनंजय बोराडे यांनीही अशा प्रकारे हॅकिंग होत असेल तर निवडणूक यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत असल्याने याबाबत गंभीर दखल घेत संबंधित हॅकरला व त्यांनी त्यांच्यावर आरोप केले यांची सीबीआयमार्फत निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान याबाबत पोलीस व शासकीय अधिकारी कॅमेरासमोर बोलण्यास तयार नसून नेमकं या प्रकरणात कशाप्रकारे चौकशी होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे