Home > News Update > लोकलने प्रवास करतांना नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी- महापौर पेडणेकर

लोकलने प्रवास करतांना नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी- महापौर पेडणेकर

आजपासून कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यात आला आहे. मात्र, प्रवास करतांना नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

लोकलने प्रवास करतांना नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी- महापौर पेडणेकर
X

मुंबई// देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी मुंबईच्या महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल प्रवासाला आजपासून सुरूवात झाली असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन रेल्वे प्रवास करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना केले.

आजपासून लसीकरण झालेल्या मुंबईकरांसाठी लोकल प्रवास करू करण्यात आला आहे. लोकलने प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना पास देण्याचे काम ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा पध्दतीने सुरू झाले आहे. महाराष्ट्र सरकारने मागील गुरुवार पासून ऑनलाईन ई-पास सुविधा देखील सुरू केली आहे.

मात्र, हा लोकल प्रवास करतांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासन- प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

Updated : 15 Aug 2021 10:34 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top