Home > News Update > चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर खुली करण्यास परवानगी देण्यात येईल- मुख्यमंत्री

चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर खुली करण्यास परवानगी देण्यात येईल- मुख्यमंत्री

चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर खुली करण्यास परवानगी देण्यात येईल- मुख्यमंत्री
X

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा, महाविद्यालयासोबतच मंदिर आणि धार्मिक स्थळ सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर आता राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे, राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर खुली करण्यास परवानगी देण्यात येईल अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे, अर्थातच हे करत असताना

कोरोनाचे नियम पाळून चित्रपटगृहे व नाट्यगृहे खुली करण्यात येणार आहे.याबाबत CMO च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच ते जाहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून चित्रपटगृह आणि नाटयगृह सुरू करण्याची मागणी कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपटगृह, नाट्यगृहाचे मालक यांच्यासह प्रेक्षकांकडून होत होती. कोरोना काळात कलाकारांना मोठा फटका बसला होता, दरम्यान आता कोरोना परिस्थिती काहीशी कमी झाली असताना कोरोना नियमांचे पालन करत या सेवा सुरू कराव्या अशी मागणी होत होती. आता राज्य शासनाने चित्रपटगृह व नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देण्याची घोषणा केल्याने कलाकारांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Updated : 25 Sept 2021 8:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top