Home > News Update > चित्रपटगृहं, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहांचा पडदा उघडणार

चित्रपटगृहं, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहांचा पडदा उघडणार

कोरोनामुळे बंद असलेल्या सेवा टप्प्याटप्याने उघडण्याच्या धोरणाचा भाग म्हणुन उद्या (५ नोव्हेंबर) पासून राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह सुरु होणार आहेत.

चित्रपटगृहं, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहांचा पडदा उघडणार
X

करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना उद्यापासूनु ५० टक्के क्षमतेने उघडण्याची संमती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. . दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रं अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मार्च महिन्याच्या मध्यापासून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहं, शाळा सगळं बंद करण्यात आलं होतं. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे.सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह उद्यापासून सुरु होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याच सोबत करोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे.

थिएटर्स सुरु करण्यात येणार असले तरीही करोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम अर्थात SOP पाळणं बंधनकारक असणार आहे.

कंटेन्मेंट झोन म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असणाऱ्या थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उघडण्यास संमती देण्यात आली आहे. अनलॉक ५ मध्ये ठाकरे सरकारने हॉटेल आणि रेस्तराँ ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उद्यापासून उघडणार आहेत. त्यामुळे थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने सिनेमा हॉल, नाट्यगृहं तसंच मल्टीप्लेक्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे.कंटेनमेंट झोन वगळून, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या जलतरणपटूंसाठी जलतरण तलाव 5 नोव्हेंबर पासून खुले होतील. जलतरण तलावाच्या वापराकरता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याने जारी केलेले एसओपी लागू होतील.कंटेनमेंट झोन वगळून, योग केंद्र 5 नोव्हेंबरपासून खुले होतील. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेले एसओपी लागू असतील.बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, शूटिंग रेज या इन्डोअर खेळांच्या केंद्रांना फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन प्रक्रिया अमलात आणून 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास अनुमती असेल.

कंटेनमेंट झोन वगळून, सिनेमाघरं, थिएटर, मल्टीप्लेक्स, नाटयगृहांना 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास 5 नोव्हेंबरपासून परवानगी असेल.सिनेमाघरं, थिएटर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नाही. सांस्कृतिक खात्याने तसंच स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या एसओपी लागू असतील. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीचं पालन करणं अनिवार्य असेल.राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी पत्रकाद्वारे ही घोषणा केली.

Updated : 4 Nov 2020 5:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top