Home > News Update > चर्चगेट येथील वसतिगृहात तरुणीचा बलात्कार करून खून, नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

चर्चगेट येथील वसतिगृहात तरुणीचा बलात्कार करून खून, नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारात वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यातच मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात 18 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे.

चर्चगेट येथील वसतिगृहात तरुणीचा बलात्कार करून खून, नीलम गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
X

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यातच चर्चगेट येथील महिला वसतिगृहातील 18 वर्षीय तरुणीवर सुरक्षारक्षकाने लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे.

नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, मुंबईत शासकीय वसतिगृहात 6 जून रोजी एक मृतदेह सापडला. तर यामध्ये जो संशयित आहे. त्या व्यक्तीचाही मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला. या सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात मी 1976-77 च्या वेळी वास्तव्य केलेलं आहे. तेव्हापासून या ठिकाणी राहणाऱ्या मुलींच्या थोड्याफार तक्रारी असल्या तरी येथे राहणाऱ्या मुली धीट होत्या. येथे काही चुकीचे घडत असेल तर त्या त्याविरोधात भूमिका घ्यायच्या. मात्र सध्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याने सुरक्षिततेला प्रचंड मोठा हादरा बसला आहे. या घटनेचा निषेध करत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणावरून निवेदन केलं असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

या घटनेच्या मागे आणखी कुणी आरोपी आहेत का? ते शोधले जावेत. तसेच वसतिगृहातील सुरक्षिततेच्या पातळीत युध्दपातळीवर बदल करण्यात यावेत. तसेच कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असं मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

नीलम गोऱ्हे यांचे निवेदन

मरीन ड्राईव्हवरील पोलीस जिमखान्याजवळ असलेल्या सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात एका 18 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. पीडित तरुणी अकोल्याची असून शहरातील महाविद्यालयात शिकत होती. ती एका कंपनीत अर्धवेळ कामही करत होती. ही घटना दि. ६ जून २०२३ रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. कथित गुन्हेगार ओमप्रकाश कनोजिया या ३३ वर्षीय सुरक्षा रक्षकाने नंतर मरीन लाइन्स स्टेशन आणि चर्चगेट दरम्यानच्या रेल्वे रुळांवर आत्महत्या केली. विवाहित आणि कुलाब्यात राहणारा कनोजिया हा या भीषण गुन्ह्यात प्रमुख संशयित होता.

वसतिगृहातील विद्यार्थीनीच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमाची, कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे.

सदर याप्रकरणी कृपया १) ९० दिवसांचा कालावधी गृहित धरुन ही नियमावली तयार करण्यात यावी. यामध्ये शहरी भाग, छोटी शहर, ग्रामीण भाग, या परिसरातील शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करून सर्वसमावेश अशी नियमावली तयार करावी.

२) तसेच विद्यार्थीनींच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल App तयार करावे. संबंधित महाविद्यालयांचे प्रमुख, विद्यार्थी-विद्यार्थीनी, त्यांचे पालक यांचा या App मध्ये समावेश करावा. यामुळे या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यास मदत होईल.

3)विद्यार्थीनींच्या तक्रारी आल्यानंतर त्यांना तात्काळ प्रतिसाद देऊन सहानुभूतीपूर्वक न्याय दिला पाहिजे, अनेकवेळा तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचे विपरित परिणाम होतात.

4) अनेकवेळा महिला किंवा मुली तक्रारीसाठी धाडसाने पुढे येत नाही. यासाठी वसतिगृह स्तरावर संवाद समिती सुद्धा गठीत करावी. त्यामुळे महिला आपल्या अडचणी मोकळेपणाने सांगतील.

5)या समितीमध्ये प्राध्यापक महिला, प्रशासकीय महिला, स्थानिक पोलीस प्रशासनातील प्रतिनिधी, सायबरवर संबंधातील प्रतिनिधी यांचा समावेश असावा.

6) वॉर्डनची अनुपस्थिती, लिपिक आणि शिपाई यांच्यामुळे झालेला गैरसंवाद, कार्यालयीन वेळेनंतर आपत्कालीन क्रमांक उपलब्ध असावेत.

Updated : 7 Jun 2023 12:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top