कादंबरी चौधरीच्या "चित्त स्पर्श" प्रदर्शनाला अफाट प्रतिसाद..
X
युवा कलाकारकादंबरी चौधरी एकदा नव्याने तिच्या नवीन कलेक्शन सोबत परत आलीये.... Covid काळातील lockdown व त्या नंतर जे जे कॉलेज ऑफ आर्ट्स मधून चित्रकलेचे शिक्षण संपादन केल्या नंतर चा तिचा हा पहिलाच वैयक्तिकरीत्या केलेला चित्र प्रदर्शनाचा प्रयत्न आहे..
विशेष म्हणजे तिने रेखाटलेल्या चित्रांना परदेशातही मागणी असून आतापर्यंत होंग-कोंग, दुबई व पेरिस येथे तिने चित्रे पाठवली आहेत.. तिच्या प्रत्येक चित्रात एक विशिष्ट भाव अणि गूढता दिसून येते... प्रत्येक कला रसिकाच्या चित्ताला स्पर्श करतील अशा कलाकृति अणि नाविन्यपूर्ण चित्रे, कादंबरी "चित्त स्पर्श" च्या माध्यमातून होटेल ओबेरॉय येथे घेऊन येत आहे.
कादंबरी सुधीर चौधरी हिने रेखाटलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचै उद्घाटन दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता हॉटेल ओबेरॉय, नरिमन पॉइंट, मुंबई येथे झाले . प्रदर्शनाचे उद्घाटन आईपीएस कृष्ण प्रकाश नागर, फ़िल्म डाइरेक्टर अक्षय ईंदिकर,
असिस्टंट एडिटर मनोज भोयर अणि पी एस आइ यशराज रखोंडे यांच्या उपस्थितीत झाले.... अणि या प्रदर्शनाचे सूत्र संचालन पीयूष पाटील यांनी केले असून प्रसिद्ध जैन इरिगेशन चे संचालक माननीय अशोक भाऊ जैन यांनी या प्रदर्शनास प्रायोजकत्व दिले आहे...कादंबरी ला मराठी ऐक्टर्स अणि बर्याच लोकांकडून प्रदर्शनासाठी खूप शुभेच्छा ही मिळाल्या आहेत. आदरणीय उज्ज्वल निकम जी यांनी व अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी देखील प्रदर्शनाला भेट दिली. अबू धाबी च्या एका फॅमिली ने कादंबरी चे 1 पेंटिंग विकत घेतले.....
कला रसिकांचा प्रतिसाद
कला रसिकांसाठी सदर "चित्त स्पर्श" प्रदर्शन दिनांक 24 डिसेंबर सकाळी 11 वाजेपासून तर दिनांक 4 जानेवारी सायंकाळी 9 वाजेपर्यंत खुले असणार आहे...ज्यांना शक्य असेल नक्की जाऊन भेट द्या...