Home > News Update > चीनी घुसखोरीची कबुली देणारी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरुन गायब

चीनी घुसखोरीची कबुली देणारी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरुन गायब

चीनी घुसखोरीची कबुली देणारी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरुन गायब
X

भारताच्या हद्दीत लडाखच्या काही भागात चीनने घुसखोरी केल्याची कबुली संरक्षण मंत्रालयाच्या कागदपत्रांमध्ये देण्यात आली होती. पण आता संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरील ही माहिती लगेचच गायब झाली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. चीनने कुगरँग नाला, गोग्रा आणि पँगाँग सरोसवर इथे मे महिन्यात चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली होती, अशी माहिती या दस्तऐवजात होती.

हे ही वाचा...

कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका, NDRFच्या टीम तैनात

विजय माल्या प्रकरणातील कागदपत्र गायब…

#sushantsinghrajputCase – CBIची कारवाई सुरू, 6 जणांविरुद्ध FIR दाखल

तसंच भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल असेही या दस्ताऐवजात म्हटले होते. चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत भारताच्या हद्दीत घुसखोर झालेली नाही असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते. तसंच या भागात चीनवर लक्ष ठेवण्याची गरज असून त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची गरज असल्याचेही या दस्ताऐवजात नमूद करण्यात आले होते.

दरम्यान राहुल गांधी यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. “चीन का सामना करना तो दूर की बात, भारत के प्रधानमंत्री में उनका नाम तक लेने का साहस नहीं है। इस बात से इनकार करना कि चीन हमारी मातृभूमि पर है और वेबसाइट से दस्तावेज़ हटाने से तथ्य नहीं बदलेंगे।“ अशी टीका केली आहे.

चीनने भारतात घुसखोरी केली नव्हती असे खोटे बोलून पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांचा अपमान केल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही टीका केली.

Updated : 7 Aug 2020 7:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top