Home > News Update > ...त्या चिमुकल्याच्या मृत्यूचे गूढ कायम

...त्या चिमुकल्याच्या मृत्यूचे गूढ कायम

...त्या चिमुकल्याच्या मृत्यूचे गूढ कायम
X


जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कोशिमशेत या गावात एका १६ महिन्यांच्या बालकाला एमआर व ट्रिपल बूस्टर डोस दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना 13 फेब्रुवारीला घडली.

आहे आरोग्य विभागाच्या गलथान कारभरामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप पीडित कुटूंबानी केला होता तसेच मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. परंतु ही घटना घडून तब्बल आठ महिन्याचा कालावधी उलटत आला असतानाही चौकशी अहवाल (सीए रिपोर्ट) लालफित अडकला असल्याने त्या चिमुकल्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. यामुळे पीडित कुटूंबाकडुन तीव्र संताप व्यक्त केला जात असू असून हे कुटूंब आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

मृत्यू पावलेल्या सर्वेश अशोक धोडी ह्याला १० फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य वाशाळाच्या नर्सने घरी जाऊन या एम आर व ट्रिपल बूस्टर डोस दिला होता. पण सर्वेशला 9 तारखेला 16 महिने पूर्ण झाले असल्याने उशिराने डोस द्या असे आपण नर्सला सांगितले पण त्यांनी ऐकले नाही, असा आरोपा सर्वेशच्या आई मंगला धोडी यांनी केला होता.

हा डोस दिल्यानंतर थोड्या वेळातच सर्वेशला ताप आला.पण डोस दिल्याने ताप आला असावा असे वाटल्याने त्याच्या आईने नर्सने दिलेले औषध त्याला दिले. पण तरीही त्याला बरे न वाटल्याने 12 तारखेला त्याचे कुटुंबिय त्याला खोडाळा येथील खाजगी दवाखान्यात घेऊन गेले. पण ताप खूप आला असल्याने बाळाला आकड्या येत असल्याने खाजगी दवाखान्यात त्याच्या उपचार करण्यात आले नाही.

खासगी दवाखान्याच्या डॉक्टरांनी त्याला मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी लगेच मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण उपचारा आगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले

परंतु सदरची घटना आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळेच घडली असल्याचा आरोप ठामपणे पीडित कुटूंबानी करत आहे.

मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती परंतु आठ महिन्याचा कालावाधी उलटत आला असतानाही या प्रकरणाची ना चौकशी झाली ना चौकशी अहवाल पोहचला यामुळे हे कुटूंब न्यायाच्या प्रतीक्षेत असून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या अन्यथा मोखाडा तहसील कार्यालयासमोर कुटूंबासाहित आमरण उपोषण करनार असल्याचा इशारा दिला आहे. मृत्यू पावलेल्या सर्वेशचे वडील अशोक धोंडी यांनी दिली आहे आमचा याबाबत पाठपुरावा सुरू असून अद्याप पर्यत सीए रिपोर्ट आला नसल्याचे मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी सांगितले.

Updated : 29 Oct 2022 6:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top