Home > News Update > कोरोना नियमांची अंमलबजावणी करताना अतिरेक होऊ देऊ नका- मुख्य सचिव

कोरोना नियमांची अंमलबजावणी करताना अतिरेक होऊ देऊ नका- मुख्य सचिव

कोरोना नियमांची अंमलबजावणी करताना अतिरेक होऊ देऊ नका- मुख्य सचिव
X

मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोनाची रुग्ण संख्या वाढण्याचा वेग जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची संख्या वाढवावी, कंटेनमेंट झोनच्या उपाययोजना प्रत्यक्षात आणाव्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव यांनी विभागीय तसेच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि तर अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. शुक्रवारी त्यांनी पुणे आणि नाशिक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील इतरांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढवावे. घरोघरी जाऊन सर्वे करावा. त्याचबरोबर दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये असलेल्या सुविधांचे अद्ययावतीकरण करुन घ्यावे, अशा सूचना मुख्य सचिवांनी केल्या.

कंटेनमेंट झोनसाठी असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरु करावी. शहरी भागात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करुन लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करतानाच नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी असे आदेशही देण्यात आले आहेत.

ज्या जिल्ह्यांचा पॉझिटीव्हीटी दर जास्त आहे तेथे लसीकरण वाढविण्याकरीता अतिरिक्त साठा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण मोहिम राबविण्यात यावी. त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. कोरोना प्रतिबंध नियमांचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही मुख्य सचिवांनी यावेळी दिले.

Updated : 12 March 2021 8:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top