मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडला रवाना. तळीये गावाला देणार भेट
X
कोकणाती लगातार दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने संपुर्ण महाराष्ट्रसह रायगड- रत्नागिरी संपुर्ण हळहळून निघाली आहे. मोठ्या संख्येन जिवितहानी , पूरग्रस्त आपत्ती, विविध भागात दरड कोसळण्याच सत्र चालू आहे. तळीये गावातील घटनेने माळीन गावची आठवन करून देत. एका क्षणात डोंगराच्या ढिगाऱ्याखाली आख्खं गावच होत्याच नव्हत झाल . आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावाला भेट देणार आहेत.
मुंबईतून हेलिकॉप्टरने महाड एमआयडीसीला जाणार आहेत. तिथून पाहणीची सूरूवात करत दुपारी १२.४५ वाजता सुमारास दरड कोसळून गाडल्या गेलेल्या महाड तालुक्यातील तळीये गावाला भेट देणार आहेत. तिथून मुख्यमंत्री मोटारीने तळीयेला पोहोचणार आहे. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करत गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करतील. त्यानंतर प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतील. अशी माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली .