मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सातारा दौरा रद्द
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 July 2021 2:13 PM IST
X
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजचा कोयनानगर दौरा रद्द झाला आहे . मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टर सातारा करिता रवाना झाले होते. परंतू मुसळधार पाऊस, वारा व ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टर कोयना हेलिपॅडवर उतरू शकले नसते.त्यामुळे माघारी येत ते आता पुण्याकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे दौरा रद्द झाल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, कमी दृश्यमानतेअभावी त्यांचे हेलिकॉप्टर कोयना हेलिपॅडवर उतरू शकले नाही. ते आता पुणे विमानतळाकडे परतले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 26, 2021
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सातारा जिल्हा पाहणी दौऱ्याला नैसर्गीक वातवरणाचा फटका बसला आहे . त्यामुळे दौऱ्यावर निघालेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांना पूण्याला परत यावे लागले अशी माहीती ट्विटरुन देण्यात आली आहे.
Updated : 26 July 2021 2:13 PM IST
Tags: Uddhav Thackeray satara Koynanagar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire