Home > News Update > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अचानक दिली विधानभवनाला भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अचानक दिली विधानभवनाला भेट

प्रकृतीच्या कारणाने गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही. पण आज रात्री अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात पोहोचले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अचानक दिली विधानभवनाला भेट
X

मुंबई // प्रकृतीच्या कारणाने गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही. पण आज रात्री अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात पोहोचले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन विधानभवनाची पाहणी केली. अचानक मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री ८ वाजता विधान भवनात अचानक भेट दिली आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची पहाणी केली. तसेच त्यांनी अधिवेशन काळात विधान भवनात कुठेही चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालण्याचा सरावही केला.

विधान भवनातील विधानसभा आणि विधान परीषदेच्या दोन्ही सभागृहात जाऊन त्यांनी पूर्व तयारीची पाहणी केली. आणि विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालय तसंच समिती सभागृहात जाऊन हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व तयारीची माहिती घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान भवनातील अचानक भेटीमुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा मानेचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली आहे.

Updated : 18 Dec 2021 7:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top